शुन्याला जीवनाचा परिघही म्हणता येते अन पृथ्वीचा गोलही..


Sunday, April 15, 2012

लाडका..

----------------------------------------------------------------------------------
कारण काही असो अश्रुंचे येणे आणि त्यातून होणारी मनाची घालमेल याचे वर्णन
करताना.....
----------------------------------------------------------------------------------
तसे काही विशेष नव्हते
आठवण तेवढी येत होती
इंजिनीरिंग पूर्ण होण्याच्या वाटेवर
मित्रांची आस लागत होती

डोळ्यांचे काय कुणास ठाऊक
कारणे त्यांना लागत नसतात
दुखाच्या मोठ्या गर्तेत असो
वा सुखाच्या छोट्या सावलीत असो
मोतीबिंदू ते गाळत असतात

एक दव बाहेर आला
ओलसर थोडे जाणवले
तोच थेट रांग लागली
हजारो असे ते धावत होते

जसे साखर थोडी पडली आहे
मुंग्यांची जत्रा भरली आहे
वारूळ आपले त्यांनी जणू
एका खड्यासाठी सोडले होते

लक्ष थोडे विचलित झाले
पाझर पूढे वाढत गेला
ते दव होते पहिले
आता तलाव मोठा भरलेला

लपवण्यासाठी पडली पापणी
पण जागा काही मावत नव्हती
जिने लपवायला केशर दिली
त्याने तिलाच चिंब करून टाकली

पाझर काही थांबत नव्हता
आस होती त्यात मित्रांची
आठवणी होत्या चार वर्षांच्या
तुमच्या आमच्या कित्येक क्षणांच्या

हळूच छातीत गोळा आला
अंग सारे शहारून गेला
सगळे आपली वाट धरणार
विचार अलगद आणून गेला

भरती आली होती मनात
पटकन डोळ्यातून वाट काढली
यावी पावसाची सर जशी
झरकन गालावरून खाली कोसळली

आल्या धारा एकामागून एक
संथ नदी जशी वाहत होती
सागराच्या कुशीत शिरण्यासाठी
घाई जशी तिला झाली होती

वातावरण अजून बिघडले
एक वावटळ हलकेच आले
श्वास रोखून धरला त्याने
आला तो हुंदका होता
मी त्याला साद म्हटले

तोच डोळ्यावरून हात फिरला
अश्रू मित्रांनी पुसले होते
पाहिले मी हलकेच सगळ्यांकडे
माझ्यासारखेच बिघडलेले वातावरण
प्रत्येकात मला ते दिसत होते

हळूच एकाने लाडका म्हटले
गालावरती माझ्या हसू उमटले
जणू रात्रीच्या त्या प्रलयानंतर
सकाळी जसे उजाडले होते
नव्या आकाशातील भरारीसाठी
पंख जसे फडफडले होते..

रंगांची उधळण..

रंगांची उधळण होत आहे
वाट तुझी पाहत आहे
या ओल्या रंगांच्या मैफलीत
न्हाऊन मी निघत आहे

सैरा-वैरा पळतो आहे
काया स्वतःची लपवतो आहे
तुझ्या एका रंगासाठी
हातभार तरी जागा वाचवतो आहे

वाटावे तुलाही सगळ्यासोबत
नाही मिसळला तुझा रंग
दिसावा उठुनी त्यातूनही
जसा पानांचा पाण्यावरती तरंग

दिसली जेव्हा मला तू
वाटले व्हावे पावसाची सर
चिंब तुला करून टाकावे
घेउनी वाऱ्याची सोबत
सगळे रंग तुझ्यावर उधळावे

पण जागचा मी हललो नाही
जणू हृदयाचे ठोके बंद झाले
पुढचे सगळे तसेच राहिले
मागचे मात्र आठवू लागले

तोच तोंडाला गारवा लागला
तुझ्या कोमल हातांनी रंगात रंग मिसळला
हात घेता तुझा हातात
लाजून तू खाली पाहिले
अनेकदा उचलले हात भरवायला
पण तुझ्या नाजूक गालाला
कधीच ते नाही लागले

हळूच तिने वर बघितले
घेउनी माझा हातात हात
हलकेच आपल्या गालावर टेकवले
एकदा नकळत हसुनी अशी
तिचे पाय धावू लागले

मला काही कळलेच नाही
जावून बसलो मी बाजूला
इकडे-तिकडे ती धावत होती
दिसेल त्या प्रत्येकावर
रंगांची पंचमी करत होती

आता कळाले होते मला
वाट ती पण पाहत होती
या पंचमीच्या सुरुवातीसाठी
माझाच रंग ती शोधत होती
माझाच रंग ती शोधत होती.

मग ती कविता आहे..

तू असह्य होऊन
काहीतरी लिहिलस का?
मग ती कविता आहे

आपलेच शब्द पुन्हा वाचून
तोच क्षण पुन्हा
मनात भरून येतो का?
मग ती कविता आहे

एकदा वाचले तरी
पुन्हा पुन्हा
वाचायचा मोह होतो का?
मग ती कविता आहे

तुझी रचना तुझ्या जगण्यात
भरभरून आनंद
भरते का?
मग ती कविता आहे

कुणाला आवडो वा
न आवडो
तुझे तसेच भागते का?
मग ती कविता आहे.

- तुषार जोशी

सहज आकाशाकडे पाहत होतो..

सहज आकाशाकडे पाहत होतो,
पाहता पाहता एक पाखरु आकाशात घिरकी घेताना दिसले,
परमेश्वराजवळ पंख मागितले,
पण सर्वच जागेवर दिले तर त्याला तरी कोण विचारील,
पंख त्याने दिले नाही,
पण पंखांसोबत असणारी दिशा मात्र दिली,
नवी दिशा, नवी आशा घेऊन चाललो आहे प्रवासाला,
काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे मनाला,
अहो नुसते पाखरू बनून आकाशात घिरकी घेण्यात काय मजा,
त्या आकाशालाही गवसणी घालण्यात असते खरी मजा....

वहीतले पिंपळ.....

"सुरकुतलेले पान ते
धमन्या फक्त दिसत होत्या
कसे म्हणावे जीव नाही त्यात
आठवणी धमन्यांतून वाहत होत्या.."

गेम तुमचाच आहे..

"नव्या दमाने उभे राहण्यातच खरे सार्थक आहे
पराजय तो होणारच
आपण पराजय टाळू शकत नाही
कारण प्रत्येक गेम जिंकणे शक्यच नसते
पण पराजय विसरू शकतात
त्यातील चुका सुधारू शकतात
आणि नव्या जोमाने पूढे जाणे
सहज शक्य होऊ शकते
जे स्वतःला अपयशी समजतात त्यांना
केवळ आत्महत्या हेच शेवटचे कारण नसते
समाधानासाठी
मी माणूस आहे आणि मला झगडायचे आहे
मरायचे नाही
आणि मरायचेच असेल तर
त्या यमराजालाही तलवार उचलायला भाग पाडू
नव्या दुसऱ्या जन्मातही
माणूसच बनवायला भाग पाडू.."

कळणार नाही....

जेव्हा मनात काहूर साचते,
मन जड होते भावनांनी,
हळूच पाणी येते डोळ्यात.
तेव्हा गरज असते,
एक मेसेज भावनांनी भरण्याची,
आपल्या माणसाला पाठवण्याची,
मग कळणार नाही मन हलके झाले कधी,
डोळ्यातले पाणी तिने पुसले कधी,
कधी आठवणी जाग्या झाल्या,
अन हलकेच ओठावर हसू आले कधी,
कळणार नाही....

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना...

उंच हवेत पाखरु भरारी घेते आहे.
त्याला फक्त संचार करायचा आहे संथ हवेत.
जिवणाचे क्षितिज गाठायचे आहे.
आता त्याचा प्रवास एका रंगतदार वळणावर आला आहे.
पण याचे मुळ त्या स्वप्नातच होते,
जे पाहिले होते त्याच दिवशी
ज्या दिवशी त्याने जगात पहिले पाऊल ठेवले,
अशाच एका दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
----वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना...

Life has different scenarios..

Life has different scenarios..
Life changes at every moment..
Life is great for a while and the next moment says it is worst..
The path we follow, we never say it is a great one in all aspects..
But we surely say the path we deal with it is a with us till we say I am
not..
The thing we hold, we never say it is with us till the end,
But we surely say the thing we hold today, is affectionate and lovely till
today..

Life changes every moment..
But the one remains steady is a Person..
Is one who try to do different..fail..and again stand..
The great one..finding silly things, so called silly happiness in tough
moments..
The great one..finding his way in every single moment..
The great one..who is living life..not solving problems of life..!

साद मिळते मैत्रीची...

थंड वारयाची झुळूक
मधेच एक पावसाचा थेंब
आठवण तीची हळूच येते
वाटते बोलावे थोडे तिच्याशी
मग जीव गुदमरतो
हळूच नको म्हणतो
पण साचलेल्या भावनांना वाट हवी असते
हळूच मैत्रीचा आडोसा आठवायला लागतो
दोन शब्द ओठातुन बाहेर पडतात
त्याला सांगायला
अन अलगद कानाला पुन्हा तोच वारा लागतो
कळते अरे इथेपण तेच वादळ उठलेय
आता काय दोन शब्द तो सांगतो अन दोन मी
जेव्हा जेव्हा चाहूल लागते प्रेमाची
गुदमरलेल्या मनाला साद मिळते मैत्रीची...

लहरी मन..

एक लहरी मन जेव्हा दुसऱ्या मनाचा लहरीपणा बघते तेव्हा काही शब्द पटकन बाहेर
पडतात आणि नकळत त्यांचा दुरावा कधी दूर करतात कळतच नाही..
....................................................................................................
तू पण माझ्या सारखीच आहेस लहरी
आज आले मनात तर
साऱ्या जगाला पालथे करण्याचे स्वप्न आपण पाहावे
वाटलेच कधी तर
या वाऱ्यालाही सोबत झुलायला लावावे
या पावसालाही चिंब करायला सांगावे
फक्त काही मनात येण्याचीच गरज असते
कधी त्या उडणाऱ्या पाखरालाही
हळूच बोलवावे थोडावेळ मांडीवर बसायला
दोन गप्पा मारायला बोलवावे
त्या नभातल्या ताऱ्याला पण कधी
आपल्या इवल्याशा घराच्या कौलावर बसून
सुखदुख थोडे विचारायला...

काही वाटा प्रेमाच्या...

तिच्या वेड्या मनाला समजावताना त्या अमानवी मनानी पण खूप काही सांगितले ते
असे...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
ती एकटीच फिरत होती
कधी हसत होती त्या फुलांसोबत
कधी दोन थेंब गाळत होती त्या उन्हासोबत
हेवा वाटावा कुणाला
असे आयुष्य ती जगत होती..

अचानक एक वळण आले आयुष्याला
चालता चालता एक मित्र भेटला सोबतीला
दोन मने जुळू लागली
एकमेकांचा ध्यास थोडा धरू लागली..

आता त्या फुलांची जागा त्याच्या हास्याने घेतली होती
त्या उन्हाची जागा त्याच्या खांद्याने घेतली होती
आताही ती हसतेय त्या फुलांकडेच बघून
पण वाट पहावी लागते त्याच्या हसण्याची
आताही ती पाणी गाळतेय त्या उन्हासोबत
पण वाट पहावी लागते खांदा त्याने देण्याची..

एवढे प्रेम ती करत होती
आस होकाराची धरत होती
विचारले तिने त्या दिवशी
एक धागा माझ्याशी तू जोडशी का
सोबती मला तुझ्या जन्माची करशील का..

पसरली निरव शांतता थोडावेळ
मग बेफाम मनाला दोघांच्या हसू थोडे खळखळले
एकाच्या हसण्यात नकार होता
दुसर्याच्या हसण्यात कारण होते मनचे दुख लपवण्याचे
दोन थेंब बाहेर येणारे आवरण्याचे..

आता ती एकटीच बसलेली
पुन्हा तीच फुले एकटक बघत
पण आज ती हसत नव्हती बघून त्यांना
नको होती तिला आज सोबत त्याच उन्हाची
शोधत होती सावलीत सावली आज ती कुणाची..

की झाले या हसणाऱ्या चेहऱ्याला
एका फुलाने हसत हळूच विचारले
तुझ्याच समोर सगळे घडले
उत्तर तिने पटकन दिले..

आम्ही फुले सगळे सोबत हसतो गातो
कधी रंगते प्रेमकहाणी आमच्याही आयुष्यात
कधी एखादा भुंगा आवडतोच की कुणाला
थोडावेळ फिरून सोबत सोडून जातोच की आम्हाला
मग आम्ही पण रडयाचेच का
एक सोबती गळून पडल्यावर आम्ही पण पडायचेच का..

तोच पानांच्या गर्दीतून एक उन्हाचे कवाडे बाहेर आले
हळूच तिच्या डोळ्यावर पडले
पटकन डोळे उघडझाप केले तिने
मग त्याने हळूच विचारले..

आज नको का सोबत माझी साजणी
वाट बघत होतो मी पण रोज रात्र पटकन सारण्याची
रोज सकाळी तुझ्या अंगावर कवाडे थोडी पाडण्याची
मलापण हेवा वाटायचा जेव्हा तू त्याच्या मिठीत होती
वाटायचे मी पण तोडावीत बंधने सारी
अन घ्यावे तुला माझ्या कवेत..

किती आस धरायची जाणाऱ्याची
आपल्यासाठी पण कोणी जगत असेल ना
असेल ना शोधत सावलीत आपली पण सावली कोणी
आपल्यासाठी पण कोणीतरी पाणी थोडे गाळत असेल ना..

मग काय हळूच खळी अवतरली गालावर तिच्या
दोन थेंब हलकेच ओघळले खाली
हलक्या पावलांनी आली उन्हाच्या कवेत ती
डोळे मिटुनी समाधान ती वेचू लागली
फुलांकडे बघितले तिने
रडू त्यांना पण येत होते
पाणी त्यांचे पुसत नाजूक हातांनी
पुन्हा त्यांच्या सोबत ती कळी हसू लागली...

मला तो थरार अनुभवायचा आहे...

मला तो थरार अनुभवायचा आहे
ज्यामध्ये विजय जीवन असेल
तर पराजय मृत्यू
ज्यामध्ये एकाच लक्ष्मण-रेषा असेल
जीवन आणि मृत्युमधली

जगायला काय सगळेच जगतात
पण असे मरण अजरामर असते
चुकून जिंकलाच गेम तर
पुढच्या विजयाची तयारी असते
हरलाच तो तर पुन्हा जगायची संधी नसते

नसतात शब्द सांगायला
चुकून आलेच दोन-तीन तर
वेळ कुणी दिला आहे तुम्हाला बोलायला
असा विजय काय असतो
मला अनुभवायचा आहे
ज्यामध्ये विजय एक जीवन असेल
तर पराजय मृत्यू..

Tuesday, March 20, 2012

कधी कधी जिवनात काय चाललेय समजतच नाही..
आलेल्या दिवसाला वा-यासारखे वाहत न्यायचे, का आयुष्याच्या वाटेवर असेच जगत रहायचे..
कधी वाटते स्वैर भरारी घेवून आयुष्याला एक स्वप्ननगरीत घेवुन जावे,
पण तडजोड माणसाचा जणु अजोड शब्दच..
याच्या शिवाय जिवन म्हणजे अशक्यच असते जणू..
यातुनच का नशीब आपली ओळख सांगते..